उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद जिल्ह्यात दोन तिन वर्षांनी एकदा तरी जात पंचायतीचे प्रकरण समोर येतेच सर्वच जातीत जात पंचायती आहेत,पारधी समाजात याचे जास्त प्रमाण आहे,सध्या जात पंचायतच्या जाचक अटीमुळे सोमनाथ काळे मृत्यु प्रकरण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर गाजत आहे, त्यामुळे जात पंचायती बरखास्त झाल्याच पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले,

 यावेळी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सचिव माधव बावगे, प्रभाकर निपाणीकर, अब्दुल लतिफ,सिध्देश्वर बेलुरे,सुरेश शेळके, गणेश रानबा वाघमारे,अॅड.अजय वाघाळे,विजय गायकवाड अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top