उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

  सोलापूर येथे पञकार प्रभाकर बाबुराव लोंढे यांची उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी मानवी हक्क विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली असुन नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधि, मानवी हक्क , आर.टी.आय. विभाग चे प्रदेशाध्यक्ष अॅड. असिफ शौकत कुरेशी यांनी जारी केले असून ते नियुक्ती पत्र भारत देशाचे माजी गृह मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांनी प्रभाकर लोंढे यांना देऊन नियूक्ती केली आहे व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या . या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधि, मानवी हक्क व आर.टी.आय. विभागाचे प्रदेश महासचिव तथा कॉग्रेस उस्मानाबाद लोकसभा अध्यक्ष अॅड. विश्वजीत शिंदे, एन.एस.यु.आय. चे प्रदेश महासचिव रोहीत थिटे, काँग्रेस चे एकनिष्ठ कार्यकर्ते बालाजी नायकल हे उपस्थित होते.

 
Top