उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सहपरिवार तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. जुलमी ठाकरे सरकारचे देवीने मर्दन करावे व महाराष्ट्रमध्ये राम राज्याची स्थापना करावी असे साकडे त्यांनी घातले.अधर्मी ठाकरे सरकारने गेल्या 6 महिन्यापासून देवी देवतांना कुलूपबंद केले होते आज त्यांची सुटका झाली आहे.आज आनंदच दिवस आहे , लाखो लोकांची चूल पेटणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेले सावट कमी होऊ दे शेतकरीला बळ दे असे साकडे त्यांनी घातले.या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित  होत

  विनापरवानगी प्रवेश केल्या प्रकरणी होणार कारवाई 

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करन्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत पञकाराशी बोलताना त्यानी नियम सर्वांना सारखे आहेत , नियमभंग केला असेल तर कारवाई केली जाईल असे सांगत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांना कारवाईचे आदेश दिले. भक्तांना सायंकाळी 6 नंतर तुळजाभवानी मंदिरात प्रवेश असताना भोसले यांना मंदिरात नियमबाह्य प्रवेश दिला गेला , भोसले यांनी विना पास प्रवेश करून मंदिर गाभाऱ्यात सहकुटुंब भाजप कार्यकर्ते सह प्रवेश केला असा आरोप केला गेला आहे


 
Top