उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नवरात्रोत्सवानिमित्त उस्मानाबाद शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम  करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून वंचित राहत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांना समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रसेविका समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारपासून सुरू झाला आहे.

राष्ट्रसेविका समिती ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर रहात महिलांचे संघटन करून त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय संस्कार करणारी महिला संघटना आहे. महिलांमध्ये सामाजिक जागृती व्हावी, महिला सामाजिक कार्यासाठी पुढे येवून कटिबद्ध व्हाव्यात यांच्यातील सद् गुणांमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न नवरात्रीतील नऊ दिवस कर्तृत्वान दुर्गांचा सन्मान करत केला  जाणार आहे.

याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद शहरातील आचार्य गल्लीत राहणाऱ्या रेखाताई रामानंद राजाज्ञे  यांचा राष्ट्रसेविका समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज बुधवारी सत्कार करण्यात आला.

रेखाताई  राजाज्ञे यांनी नारदीय कीर्तन सेवेतून  हाती घेतलेला सामाजिक प्रबोधनाचा वसा मागील अनेक वर्षांपासून सुरू ठेवला असून प्रबोधनाच्या कार्याचा दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून  अनेक वेळा प्रबोधनात्मक कीर्तनाचा लाभ अनेकांना झाला आहे. सामाजिक जाणिवेतून करत असलेली त्यांची ही कीर्तन सेवा उत्तरोत्तर अशीच होत राहो यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी त्यांचे सामाजिक योगदान सर्वांसमोर यावे या भावनेने त्यांचा आज राष्ट्रसेविका समिती आणि अभाविपच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या सौ सुरेखा धोत्रीकर सौ अंजली कुलकर्णी सौ प्रज्ञा महाजन सौ मोरे ताई यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या अनेक सेविका उपस्थित होत्या.


 
Top