परंडा / प्रतिनिधी -

परंडा तालुक्यातील मौजे वागेगव्हाण  येथील बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने बंधाऱ्या च्या परिसरातील अनेक शेतक-र्याचे जमीनी  वाहून गेली आहेत यामुळे माजी आमदार राहूल मोटे यांनी बंधार्या ची पाहणी करून बंधारा अधिकारी, व तहसिलदार यांना शेतक-र्यांना मदत म्हणून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे दिल्या सुचना.

 मागील महिन्यापासून उस्मानाबाद जिल्हा व परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना - कोळेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सदर धरणातून सीनानदी मध्ये अतिरिक्त पाणी सोडल्याने तसेच वागेगव्हाण व परिसरात झालेल्या पाऊसामुळे सीनानदीला महापूर आला होता. 

या महापूरात परंडा तालुक्यातील वागेगव्हाण व माढा तालुक्यातील कव्हे या गावांच्या सीमेवर असलेला बंधारा खचून वागेगव्हाण हद्दीतील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. 

 त्यामुळे वागेगव्हाण येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जोपर्यंत सदर बंधारा दुरुस्त होणार नाही तोपर्यंत भीमा-सीना जोड कालव्या मधून येणारे पाणी अडणार नाही.त्यामुळे वागेगव्हाण येथील बंधाऱ्याच्या बॅक वॉटर वर अवलंबून असणाऱ्या परंडा तालुक्यातील कपिलापुरी, करंजा, आवर पिंपरी., पिठापुरी, वडनेर-देवगाव या गावांना मोठा तोटा होऊ शकतो. 

 या समस्याचे गांभीर्य  लक्षात घेऊन माजी आमदार राहुल  मोटे यांनी मौजे वागेगव्हाण  येथील   बंधाऱ्याला भेट देऊन बंधारा ची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणे संदर्भात परांडा तहसीलदार यांना सूचना दिल्या. तसेच बंधारा दुरुस्ती काम तात्काळ करणेसंदर्भातच्या सूचना स्पॉटवर उपस्थित असणारे भीमा विकास उपविभाग कुर्डूवाडी येथील शाखा अभियंता श्री रावसाहेब ढाणे, यांना दिल्या तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर चे अधिक्षक अभियंता श्री साळे साहेब यांच्याशीही भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शॉर्ट कालावधी साठी टेंडर काढून काम जलदगतीने करण्या संदर्भात. व  काम लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या. सदर बंधारा चे काम कायमस्वरूपी मजबूत होण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांच्याकडे बैठक आयोजित करून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आ.राहुल मोटे यांनी सांगितले. 

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड. .संदीप खोसे पाटील, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती नवनाथ आप्पा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,जिल्हा परिषद सदस्य , गोर्वीद जाधव, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक धनंजय हांडे, बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे, पंचायत समिती सदस्य अमोल करळे , लीगल सेलचे सुहास पाटील , सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अश्रू लेंगरे, बाळासाहेब पाटील कपिलापुरी, वस्ताद शिवाजी माने कपिलापुरी, युवक राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष सचिन पाटील, लोहारा चे माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब बैरागी, प्राध्यापक शरद झोंबाडे,श्रीहरी नाईकवाडी, शहर युवक अध्यक्ष अजय बनसोडे, तसेच वागेगव्हाण येथील 

सरपंच सौ. लता जगताप., उपसरपंच सौ.भाग्यश्री गवळी., ग्रामपंचायत सदस्य विनोद जगताप., शिवाजी लुंगसे.,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल काळे., अमोल जगताप,बालाजी ठोंगे., महारुद्र ढेरे., शंकर चव्हाण, हनुमंत चव्हाण, संतोष जगताप, दिलीप थोरबोले, श्रीहरी थोरबोले, कानिफनाथ थोरबोले,महेश चव्हाण,अतुल तोरमल, किरण जगताप, गणेश चव्हाण, निलेश लुंगसे, नामदेव चव्हाण, संजय चव्हाण, समाधान गवळी, अप्पासाहेब जगताप, काका जगताप,उज्ज्वल चव्हाण, संतोष जगताप, योगेश जगताप,रामहरी ठोंगे,काका थोरबोले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top