उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मदत देण्यात आली आहे. मात्र, या मदतीवरुन शेतकऱ्यांची चेष्टा सुरु असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नसतो, असा राजू शेट्टी यांनी उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे ऊस शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांवर शब्दींक बाण सोडले. 

 मुख्यमंत्री शाब्दिक खेळ करतात. शाब्दिक खेळ करुन शेतकऱ्यांना आधार मिळत नसतो. जे द्यायचं ते तात्काळ द्या. सरकारकडे तिजोरीत मदत द्यायला पैसे नसतील तर मंत्र्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवा, असा हल्लाबोल शेट्टी यांनी केलाय. सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं वाटत नाही, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. जागर FRP चा, आराधना शक्ती पिठाची, असा नारा देत राजू शेट्टी यांनी उस्मानाबादेतून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आयोजित करण्यात आलीय.

पाच वर्षांतील श्वेत पत्रिका काढा

गेल्यापाच वर्षांत सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स यांनी कोठे-कोठे धाडी टाकल्या आहेत. या धाडीत काय मिळाले या संदर्भातली श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी करून राजु शेट्टी यांनी राज्यात सध्या राजकीय टोळी युध्द सुरू आहे. कधी केंद्रीय मंत्र्याला अटक होते. तर कधी राज्यातील मंत्र्यांवर धाडी पडतात, असा आरोप करून शेट्टी यांनी या तिनीही संस्थेचा गैरवापर होत आहे.भाजप मधील कांही लोकांनी ही गैर व्यवहार केला आहे. त्यांच्यावर का धाडी पडत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून भाजप मधे गेले की, पवित्र होतय का ? असा टोला ही राजु शेट्टी पत्रकाराशी बोलताना लगावला 


 
Top