तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी नावाने डोमेननेम वापरुन चार व्यक्तींनी वेबसाईड काढुन भाविकांचे आँनलाईन पैसे घेवुन फसवणूक केल्या प्रकरणी मंदीर संस्थानने शनिवार दि. २३रोजी राञी उशिरा तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

 या प्रकणी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे   सहायक व्यवस्थापक ( विद्युत  )  अनिल बापुराव चव्हाण यांनी   दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, श्री तुळजाभवानी मंदीराची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org ही आहे . दि . 20 ऑक्टोबर 2021 रोजीचे  अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांचे पत्र जावक क्र 2021 / उप चिटणीस / NAG3 / कावी -1229 दि . 20 ऑक्टोबर 021 रोजीचे पत्र व बाळासाहेब वसंतराव सुभेदार छत्रपती संभाजी राजे कॉलनी , जाधववाडी रोड उस्मानाबाद यांचे तक्रारीनुसार तुळजाभवानीच्या नावाने बोगस वेबसाइट काढून भाविकांची दिशाभुल करून अर्थिक  लुट प्रकरणी  https://www.tuljabhavani.in ही वेबसाइट पाहणी करण्याचे आम्हास आदेशीत केल्याने आम्ही दि . 23 ऑक्टोबर 2021 रोजी 11 ते 12   च्या दरम्यान सदर वेबसाइडची पाहणी केली असता या वेबसाइडवरती तुळजाभवानी नावाने डोमेननेम वापरुन भाविकांचे ऑनलाइन पैसे  घेवुन फसवणुक केली आहे . वास्तविक पाहता सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अभिषेक पूजा विधी बंद आहेत . तसेच खालील डोमेननेम वापरुन भाविकांची फसवणुक व ऑनलाइन पैशाची लुट केली आहे. 1 ) https : //tuljabhavanipujari.com 2 ) https : //tuljabhavanimandir.org3 ) https : // shrituljabhavani . com 4) https://epuja.co.in/productdetails.php?puja-idpageTuljapur-TuljaBhavani-Devi-Templea वेबसाईटवरुन तुळजाभवानी नावाने डोमेननेम वापरुन भाविकांचे ऑनलाइन पैशे घेवून फसवणुक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करावी अशी फिर्याद दिली आहे.  या फिर्यादीनुसार  पोलिसांनी अज्ञात  व्यक्ती  विरोधात गुरंन 365/21कलम 420

माहीती तंञज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008  66 सी, माहीतीतंञज्ञान(सुधारणा)अधिनियम2008   66 डी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 
Top