उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात यापुर्वीही जात पंचायत सारख्या घटना घडल्या होत्या. परंतू ही सर्व प्रक्रिया अंत्यत गुप्तपणे होत असते. ते लोक बाहेर कांही सांगत नाहीत, त्यामुळे जिल्हयात जात पंचायत सारख्या घटना घडू नये यासाठी जनजागृती द्वारे प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पुलिस अधिक्षक नीवा जैन यांनी पु.वि.लोकराराज्यशी बोलताना सांगितले.

उस्मानाबाद जिल्हयात जात पंचायतच्या त्रासाला कंटाळून पारधी समाजातील पती-पत्नी ने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १४ दिवसानंतर पतीचे निधन झाले होते. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस अधिक्षक जैन यांची भेट घेतली असता त्यांनी यामधील आरोपींना पकडण्यासाठी टीम रवाना झाल्या आहेत. आरोपींचे पत्ते कायम नसल्यामुळे आरोपी सापडण्यास विलंब लागत आहे. येत्या कांही दिवसात यातील सर्व आरोपी पकडू असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला. उस्मानाबाद जिल्हयात यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. 

दोन आरोपी अटकेत

जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून शहरातील पारधी समाजातील तरुण पती-पत्नीने विष प्राशन केले होते. यातील पतीचे निधन झाले. जात पंचायतीच्या पुढाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी रुग्णवाहिकेसह मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता. त्यानंतर आनंदनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.६) रात्री उशिरा पाच पंचांसह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पैकी कालिदास महादू काळे, दादा उद्धव चव्हाण (दोघे रा. राजेशनगर, पारधी पिढी, ढोकी)  या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.


 
Top