तुळजापूर / प्रतिनिधी-  

आई तुळजाभवानी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजुन घेण्याची संवेदनशिलता व 2019 प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची सदबुध्दी दे आणी विमा कंपनीवर कारवाई करण्याचे धर्य या सरकारला दे असे देविचरणी  साकडे घातल्याची माहीती आ. अभिमन्यु पवार यांनी औसा ते तुळजापूर पायी दिंडी समारोपानंतर पञकारांशी संवाद साधताना दिली.

यावेळी बोलताना आ.  पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ही औसा ते तुळजापूर पायी दिंडी काढली यात सात किलोमीटर स्वत: आ. राणाजगजितसिंह पाटील सहभागी झाले होते.

 आमची मागणी 2019 मध्ये कोल्हापूर सांगली पुर आल्यानंतर जी मदत दिली त्या निकषानुसा मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्यावी, मागील वर्षीचा पिकविमा मिळाला नाही, या वर्षी पुन्हा नुकसान झाल्यानंतर नियमानुसार २५% आगाऊ विमा म्हटलं तर तेही दिले नाही, शरद पवार पक्षासाठी भिजले आता शेतकऱ्यांनसाठी  पावसात भिजुन शेतकऱ्यांना मदत करावी, भिजल्यामुळे त्यांच्या जागा वाढुन त्याचा त्यांना फायदा झाला. त्यामुळे पवारांनी पाहणीसाठी बांधावर यावे ,असे आवाहन केले. 

प्रारंभी प्रास्तविक जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. यावेळी अँड. अनिल काळेसह नारायण नन्नवरे व भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते. 

 
Top