भूम / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा हा बजाज कंपनी कडे शेतकऱ्यांना विमा लाभ साठी असल्याने भूम तालुक्यात काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल पाठवल्याच तक्रारी आल्याने  नंतर प्रशासकी अधीकारी एकत्रित येऊन पाहणी करीत आहेत असे चित्र  भूम तालुक्यातील आंभी मंडळातील मौजे राळेसांगवी शिवारात दिसून आले आहे. 

सांगवि गाव प्रत्यक्ष पाहणीसाठी निवडले असल्याने  कृषी अधिकारी शेतकरी, सरपंच शेतकरी संघटना समक्ष पीक कापणी, मळणी व वजन करण्यात आले. अर्ध्या गुंठा सोयाबीन कापनी करून वजन केले असता 2.80 ग्राम इतका उतार सोयाबीनसाठी आंभी मंडळात उंबरठा उत्पादन क्षमता आढळुन आली. 

प्रत्यक्ष पाहणी प्रसंगी कृषी सहायक  ए जी गायकवाड, क्लेम मॅनेजर देविदास कोळी, प्रदीप चंदनशिवे,बजाज कंपनीचे तालुका प्रतिनिधी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी पाटील, शेतकरी उपस्थित होते.

 
Top