उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रतिष्ठान भवन येथे भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी माझे घर माझी बाग ह्या स्पर्धेच्या बक्षीसवितरणाचा कार्यक्रम तुळजापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय राणाजगजितसिंह पाटील व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते पार पाडला. 

उस्मानाबाद शहरातील पाणी प्रश्नावर तसेच त्यांना नागरिक म्हणून ज्या काही मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे त्यावरही एकदम रोखठोक असे भाष्य आमदार राणाजगजितसिंह यांनी केले. केंद्र सरकारकडुन महिलांच्या व्यवसायासाठी तसेच त्यांच्या सन्मानार्थ वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. महिलांनी  व्यवसायासाठी पुढे यावे आम्ही त्यांना बॅंकेकडुन कर्ज मंजूर करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु असा विश्वास समस्त महिलांना दिला. तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने राबविलेल्या ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुकही केले. तसेच कमी जागेत महिला त्यांची बाग खुप चांगल्या पध्दतीने जोपासतात. महिलांच्या वेगवेगळ्या कौशल्यावर प्रकाश टाकुन त्या साक्षात दुर्गा बनुन प्रत्येक कामात सहभाग नोंदवतात हे प्रोत्साहनपर बोलुन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन   काळे यांनीही महिलांना मोलाचे असे  मार्गदर्शन केले आणि प्रत्येकीने घराच्या छोट्याशा का होईना जागेत इतर झाडांसोबत भाज्यांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देवून शुभेच्छाही दिल्या.

 याप्रसंगी प्र.का.स.ॲड. खंडेराव चौरे, यांच्या सह युवती मोर्चाच्या पूजा राठोड, देवकण्या गाडे व शहरातील माझे घर माझी बाग या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक महिला उपस्थित होत्या. प्रस्ताविक  महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीताताई गुंजाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले डॉ. अंजली काळे, डॉ.रुपाली शेटे, सुरेखा कुलकर्णी, विनीता कुलकर्णी, सुनिता कुलकर्णी, सुनीता गुंजाळ तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ.अनार साळुंके मॅडमचेही मोलाचे असे सहकार्य लाभले त्यांच्या या योगदानासाठी सर्व परिक्षकांचा सन्मानचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.


 
Top