तुळजापूर / प्रतिनिधी- 

शारदीय  नवराञोत्सवास गुरुवार दि.७ रोजी घटस्थापनेने व  भाविकाविना आरंभ झाला. देविजींची मुर्ती गुरुवार दि.७ रोजी  पहाटे   सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापीत करण्यात आली. नंतर देविजींना पंचामृत शुध्द स्नान घालण्यात येवुन वस्ञोलंकार  घालण्यात आल्यानंतर नित्योपचार पुजा करण्यात आली. सकाळी पुनश्च नियमीत दुग्धअभिषेक  करण्यात आल्यानंतर   वस्ञोलंकार घालण्यात  आले नंतर सकाळी ११ वा.  श्रीगोमुख तिर्थकुंड येथे तीन मृद कलशाचे पुजन करण्यात आल्यानंतर हे घटकलश पारंपारिक वाद्याचा गजरात मिरवणूकीने मंदीरात आणण्यात आल्यानंतर सिंह गाभाऱ्यात ईशान्य दिशेला श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात आली.नंतर अनुष्ठानासाठी ब्रृम्हवृदांना वर्णी देण्यात आली.नंतर उपदेवतांचा ठिकाणी घटस्थापना करण्यात आल्यानंतर  तुळजापूरात घरोघरी घटस्थापना करण्यात येवुन  जोगवा मागण्यात आल्यानंतर  शारदीय नवराञ उत्सवास आरंभ  झाला.

यावेळी मंहत तुकोजीबुवा ,मंहत हमरोजीबुवा ,भोपेपुजारी सुरेश परमेश्वर कदम,  मंहत वाकोजीबुवा ,उपविभागीय अधिकारी  योगेश खरमाटे, आ.राणाजगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार सौदागर तांदळे, तहसिलदार तथा प्रशासकीय व्यवस्थापक योगिता कोल्हे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले ,नागेश शितोळे  , पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन सांळुके, भोपेमंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, उपाध्य मंडळ,अध्यक्ष अनंत कोंडो सह तिन्ही मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, मानकरी ,भोपे पुजारी उपस्थितीत होते.

सांयकाळी पुनश्च श्री तुळजाभवानी मातेला  दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर देविस वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात व मंहत वाकोजीबुवा, गुरुतुकोजीबुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यावर  शारदीय नवराञ उत्सवातील पहिल्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.

 
Top