उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील शेतकर्‍याने कर्जास व अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे गळफास घेवून आत्महत्या केली होती. या कस्पटे कुटूंबियांची राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी भेट घेवून बुधवारी (दि.6) सांत्वन केले.

मंगरूळयेथील नारायण विश्वनाथ कस्पटे (वय 50) यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढले होते. तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे  प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे यातून निराश होवून त्यांनी घराच्या चौकटीस गळफास घेऊन आत्महत्या केली. या परिवारास दुधगावकर यांनी सांत्वनपर भेट दिली. याप्रसंगी खेलबा सुडके, नानासाहेब नहाने, ज्ञानेश्वर माने आदी मंडळी उपस्थित होती.


 
Top