उस्मानाबाद / प्रतिनिधी-

परांडा येथील अल्पवयीन मुलीवरील झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ  व त्या नराधामास फाशीची शिक्षा देण्याची मागणीचे भारतीय जनता महिला, युवती व युवा मोर्चा उस्मानाबादच्या वतीने पोलिस अधीक्षक नीवा जैन मॅडमला व जिल्हाधिकारी यांना  देण्यात आले. 

टाकळी, तालुका परंडा येथील एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.  ही घटना झाल्याचे समजताच परंडा पोलिस पथकाने संबंधित नराधामास अटक केली असली तरी सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर आरोपीची सखोल चौकशी करुन त्यास कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात यावी व बाल लैंगिक शोषण कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेवून संबंधित नराधामास फाशीची शिक्षा द्यावी. तसेच या घटनेचा निपक्षपातीपणे तपास करुन पीडित कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. या घटनेमागे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे

. यावेळी भारतीय जनता महिला मोर्चाच्या अर्चनाताई अंबुरे, जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हासरचिटणीस जोशीलाताई लोमटे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष पुजा देडे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड आणि युवा मोर्चा सरचिटणीस देवकन्या गाडे आदी उपस्थित होत्या.

 
Top