उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्मृती बुद्ध विहार समिती उस्मानाबादच्या वतीने बुद्ध धम्म रॅली काढण्यात आली. रॅलीत भीम बौध्द अनुयायी उत्साहाने सहभागी झाले होते.  महिला भगिनी, विद्यार्थ्यी यांचा लक्षणीय सहभाग होता.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भीम नगर, मारवाडी गल्ली,काळा मारुती मंदिर चौक, जिल्हाधिकारी निवास चौक,संत गाडगेबाबा चौक ते बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली.रॅलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या नावाचा जयघोष करीत तथागताची एकच वाणी बुध्दम शरणम गच्छामि..जग मे बुद्ध का नाम है भारत की यह शान है अशा घोषणा देण्यात आल्या.रॅलीत सहभागी मंगल डांगे,आशा शिंगाडे,जयश्री चव्हाण,नंदा बनसोडे,रंजना माने,बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे,नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,कमलाकर बनसोडे,राजेंद्र धावारे सर,गणेश रानबा वाघमारे,प्रसेना ग्रुपचे संदिप बनसोडे, प्रसेन्नजीत सरवदे,शितल चव्हाण, अमोल वाघमारे, दादासाहेब जेटिथोर, स्वराज् जानराव,नरेन वाघमारे,प्रमोद हावळे,उदय बनसोडे,बाबाराव बनसोडे, सुमेध क्षिरसागर,दुष्यंत बनसोडे,प्रज्ञावंत ओव्हाळ,सचीन डोंगरे, दादासाहेब मोटे, बाळासाहेब सरवदे,दिपक डावरे, आविनाश डांगे,संजय माळाळे,कुंदन बनसोडे,रणजीत कांबळे,गिरीश माने,राणा बनसोडे,विनायक गायकवाड,प्रेमचंद सपकाळ,अन्य इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजकांनी धम्म रॅलीस सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासन बांधवांचे आभार मानले.धम्म रॅलीचे आयोजन स्मृती बुद्ध विहार समिती तर्फे करण्यात आले होते.

 
Top