उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

क्रांतीपाईक प्रमोद मांडे पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन शहरातील यशश्री क्लासेस येथे रविवार दि. १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इतिहास संशोधक प्रा.डा. सतीश कदम यांचा प्रमोद मांडे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी लेखक व गझलकार संतोष घुले तर प्रमुख उपस्थितीमध्ये  पत्रकार राहुल कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम रविवारी सकाळी ९.३० वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

 
Top