भूम / प्रतिनिधी :- 

शहरात आज भीमनगर, लक्ष्मी नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचरगी ध्वजाचे  ध्वजारोहण करण्यात आले.

भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, स. पो. नी. मंगेश साळवे  यांच्या हस्ते  तसेच पुजापाठ बाळासाहेब सुकाळे, 

यांच्या हस्ते तर लक्ष्मी नगर येथे भूम नगर परिषद गटनेते यांच्या हस्ते ध्वजारोहण तर पूजा पाठ जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ संयोगीता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी .प्रसंगी  ऑल इंडिया पँथर सेना चे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड , संदीप सरवदे, रोहित गायकवाड, महेंद्र गायकवाड, नगरसेविका सारिका थोरात ,चोकोबा कांबळे सर,मस्के सर, सोनवणे आदी उपस्थित होते.
 
Top