तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील मंगरूळ येथील युवा सर्प मित्र महेश पारधे व सोहेल शेख यांनी कोब्रा जातीच्या सापास पकडून सुखरूप आपसिंगा येथील  वन विभागात सोडले.  आत्तापर्यंत या युवकांनी मंगरूळ व परिसरातील गोनस , मण्यार , फुरशा , कोब्रा , धामीन , तस्कर , कुकरी , ऐरुळा , धुळनागीण , कवड्या , गवत्या , ब्लॅक कोब्रा , किंग कोब्रा या जातीच्या सरपाणा जीवदान दिले आहे 

 कामात यांच्यासोबत राहुल जेटीथोर , रोहित जेटीथोर हे सुध्दा हिरिरीने सहभागी असतात त्यांच्या या साप हाताळण्याच्या कलेबद्दल  परिसरातून कौतुक केले जात आहे. त्यांनी आत्तापर्यंत हजारो विविध जातीच्या  गाव , घर , शेत शिवारातील आढळुन आलेल्या सापांना जीवदान दिले आहे. यांना शासनाने अधिकृत ओळखपत्र देऊन योग्य ते मानधन द्यावे, अशी मागणी या सर्प मित्रांकडून केली जात आहे तसेच गाव परिसरात कुठेही साप आढळल्यास न मारता आमच्याशी संपर्क साधावा ,असे  आवाहन ही  त्यांनी केले. 

 
Top