तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील पिंपळाब्रु येथील  शेत रस्त्याच्या कामात भरष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पिंपळा (ब्रु ) येथील ग्रामस्थाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज देवुन केली आहे.

महात्मा  गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूरी मिळविलेल्या ग्रामपंचायत कार्यालय मौजे पिंपळा ( बु ) (ता . तुळजापूर जि . उस्मानाबाद ) खालील RC सुगराव इंगळे ते पाणी पुरवठा विहीर देवकुरळी शेत रस्ता 2 कि . मी . शेत रस्ता मंजूर झाला आहे. त्या रस्त्याचे कसलेही काम न करता खोटे मजूर दाखवून  89249 रुपये एवढया रक्कमेचा भ्रष्टाचार केला आहे संविधानाने मिळालेल्या अधिकाराचा गैर फायदा घेऊन स्वतचा आर्थिक फायदा करणाऱ्या रोजगार सेवक व सरपंच , ग्रामसेवक , सह अन्य संबंधितांनवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी धोतरकर या ग्रामस्थाने तक्रार देवुन केली आहे.

 
Top