उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी धोरणात्मक निर्णयांची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे यादृष्टीने आरोग्य हक्क परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणारे काम लोकांना उपयोगी ठरणारी आहे असे उद्गार जिल्हा आयुष अधिकारी जी.आर. परळीकर यांनी काढले.

उस्मानाबाद येथे जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य हक्क परिषदेच्या व्यासपीठावर जिल्हा आयुष अधिकारी जी आर परळीकर, माध्यम तज्ञ ज्येष्ठ पत्रकार डॉ. सतीश महामुनी, ज्येष्ठ विधिज्ञ देविदास वडगावकर, निवृत्त जिल्हा बालकल्याण अधिकारी अशोक सावंत, समाजसेविका तृप्ती जोशी, यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यामधून ६० प्रतिनिधी या जिल्हास्तरीय आरोग्य हक्क परिषदेला उपस्थित होते.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्राला सुरुवात झाली व यावेळी एकल महिला संघटनेच्या सौ सुरेखा भोसले यांनी आरोग्यविषयक प्रश्नांची मांडणी केली त्याचबरोबर सर्वेक्षणातून हाती आलेले निष्कर्ष या परिषदेमध्ये मांडले. सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांनी या हक्क परिषदेमध्ये समन्वयाने काम करीत जन आरोग्य समिती मूलभूत आरोग्य विषयक सुविधा सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे हाती आलेले प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर मांडून चर्चने सोडवण्यासाठी येथे प्राधान्य दिले जाईल उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यविषयक परिस्थिती आणि उपलब्ध असणारी संसाधने त्याचा होणारा उपयोग या अनुषंगाने सातत्यपूर्ण काम केले जाईल असे सांगितले.

एकल महिला संघटनेच्या वतीने कांता शिंदे यांनी उस्मानाबाद शहरातील खाजा नगर येथे घडलेल्या आकस्मित घटनेवरून से आरोग्याचे प्रश्‍न जटिल झाले याचे उदाहरण परिषदेत सांगितले. उमरगा येथील सुमित कोथिंबिरे यांनी याप्रसंगी जन आरोग्य अभियानात सक्रिय होण्याचे आश्वासन दिले. लोकप्रबोधन अध्यक्ष धनाजी धोतरकर यांनी तुळजापूर तालुक्यातील आरोळी बुद्रुक व देवसिंगा येथील आरोग्य केंद्रातील प्रश्न उपस्थित केले. परंडा तालुक्यातील अनुराधा अंबुरे यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत असा मुद्दा उपस्थित केला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून काम करणारे राज्यातील 22 हजार कंत्राटी कर्मचारी कायम सेवेत होण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने जन आरोग्य समितीने कर्मचाऱ्यांना उच्चस्तरीय सहकार्य करण्याची अपेक्षा  कर्मचारी संघटनेचे एसएस बारकुल यांनी व्यक्त केली. हॅलो संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्या वासंती मुळे यांनी याप्रसंगी सखी वन स्टॉप या उपक्रमाची माहिती दिली आणि जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कोरोणा काळात आरोग्य सुविधा देण्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांच्याकडून देण्यात आलेल्या सुविधा संदर्भात त्यांनी आपले मत जाहीरपणे व्यक्त केले.

सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती जोशी यांनी मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्नांच्या अनुषंगाने आपले विचार मांडले त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचना मधून उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण काम करू असा निर्धार व्यक्त केला . निवृत्त बालकल्याण अधिकारी अशोक सावंत यांनी जन आरोग्य समिती सामान्य माणसाच्या उपयोगासाठी येणाऱ्या कामासाठी संघर्ष आणि समन्वय या माध्यमातून काम करीत आहे हे स्तुत्य आहे असे सांगितले. ज्येष्ठ विधिज्ञ देविदास वडगावकर यांनी सामान्य माणसाला आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन बरोबर संवाद ठेवत उणिवा दूर करत काम केले पाहिजे प्रसंगी जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांना यासंदर्भात या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्ष वेध घेण्याच्या सूचना केल्या पाहिजेत असे सांगितले. माध्यम तज्ञ ज्येष्ठ पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांनी सामान्य माणसाला शासकीय आरोग्य सेवा आपली आहे याची जाणीव झाल्याशिवाय या सुविधा सक्षम होणार नाहीत आरोग्याचे प्रश्‍न सोडवणे कार्यकर्त्यांनी आपल्या पंचक्रोशी मध्ये आपली ओळख निर्माण करून प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारीवर्ग बरोबर चर्चा करावी त्यामधून अनेक प्रश्न सुटू शकतील. जन आरोग्य समिती निश्चितपणे सर्व तालुक्यातील प्रश्नासाठी समन्वयाने व चर्चेमधून प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे असे सांगितले. जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याशी लवकरच शिष्टमंडळ भेटून हे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहोत असे सांगितले.

आरोग्य हक्क परिषदेसाठी उपस्थित प्रमुख शासकीय अधिकारी जिल्हा आयुष अधिकारी जीआर परळीकर यांनी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आणि सर्व लोकांनी सकस आहार घेतला पाहिजे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्र शासन विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना उपचार देण्याचे काम करते या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे या कामासाठी प्रशासनाकडून ागणारे सहकार्य निश्चित केले जाईल असे आश्‍वासन त्यांनी या जिल्हास्तरीय आरोग्य हक्क परिषदेमध्ये दिले. आरोग्य हक्क परिषदेचे सूत्रसंचालन व आभार धनाजी धोतरकर यांनी मानले


 
Top