उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भांडगाव (ता.परंडा ) येथे एकता गणेश मंदिरानजिक ग्रामसचिवालय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन सोहळा  उस्मानाबाद खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, जेष्ठ नेते विजयसिंह थोरात, शिवसेना नेते प्रशांत चेडे, जि.प.कृषी सभापती दत्ता  साळुंके गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी  जनसेवेचा वसा घेऊन जिल्ह्याचा विकास करणार , असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. 

 उस्मानाबाद  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास चालना देण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या 21 टीएमसी पाणी आणण्यासाठी लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आवाज उठवला. 21 tmc पैकी 7 टीएमसी पाणी आणण्यासाठी आपले नेते,   शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख  प्रा.तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, असे ओमराजे म्हणाले. 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, जि.प माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, जि.प.माजी सदस्य महादेव अंधारे, भूम पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ, जिल्हा संघटक मेघराज पाटील, डॉ.संजय अंधारे, सभापती अनुजा दैन, नाना अंधारे, पं.स.सदस्य हुके सर, सरपंच शंकर भोसले, उपसरपंच बालाजी अंधारे, जवळा उपसरपंच रमेश नाना कारकर, सुनिल अंधारे, दत्ता अंधारे, अशोक अंधारे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार निधी बंद

 माझा खासदार निधी केंद्र सरकारकडून बंद असल्याने विकास कामे करण्याची इच्छा असतानाही करता येत नाही याबद्दल दुःख आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून गावातील शेत रस्ते करताना तक्रारी करू नका, विकासाची कामे करताना त्यात राजकारण आणू नका. मी केवळ आश्वासने नाही तर कामे करून दाखवणार आहे. असा शब्द खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला. 


 
Top