परंडा / प्रतिनिधी :

 परंडा तालुक्यातील सिरसाव येथे घटस्थापना मुहूर्तावर ३ गावातील महिला बचत गटांना ३६ लाखांचे वितरण करण्यता आले.  भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान परंडा यांच्या वतीने आर्थिक साक्षरता व कर्ज वितरण मेळावा सिरसाव येथे आयोजित करण्यात आला. सिरसाव, वाकडी, हिंगणगाव बु. या तीन गावातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मधील २४ गटांना ३४ लाखांच्या कर्जाचे मंजुरी पत्राचे वितरण जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्री निलेश विजयकर, बॅंक मॅनेजर हेमंत पवार, जिल्हा समन्वयक विकास गोफणे, आर्थिक समावेशन चे  तालुका व्यवस्थापक मानिक सोनटक्के, प्रभाग समन्वयक विजय गवळी, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके व लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. बचत गटातील महिलांना (SBIRSETI) अंतर्गत विविध प्रशिक्षणाचे उद्योजकता अभ्यास परिपञक देऊन मान्यवरांच्या हस्ते साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बॅंक विषयी विविध योजनेचा व खात्याचें मार्गदर्शन श्री निलेश विजयकर यांनी केले. 

[ बचत गटातील महिलांनी विविध हस्तकला वस्तूंचे देखावे जिल्हा अग्रणी बॅंक चे (LDM) श्री निलेश विजयकर यांना सादर केले असता ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हस्तकला व्यवसायात शुभेच्छा दिल्या.] 

यावेळी उपस्थित सरपंच श्री कुमार वायकुळे, जिल्हा अग्रणी बॅंक चे निलेश विजयकर, जिल्हा समन्वयक विकास गोफणे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रभाग समन्वयक विजय गवळी,  लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण, सदस्य कोकीळा चोबे, प्रेरिका सिमा नवले, मनिषा नवले, ग्रामसंघ अध्यक्ष रविना झोळ, सचिव जयश्री चोबे, आर्थिक साक्षरता सखी सारीका अंधारे यांच्यासह आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाग समन्वयक विजय गवळी व प्रेरिका यांनी परिश्रम घेतले .

 
Top