उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी फिरते लसीकरण पथक ही ग्रामीण आणि शहरी भागासाठी कार्यरत करण्यात आले आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण राहिले आहे, त्या सर्वांणी  लसीकरण करुन घेवून स्वत:चे आणि कुटुंबियांचे या आजारापासून संरक्षण करावे आणि जिल्हा कोविड मुक्त करण्यासाठी जिल्हा  प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.


 
Top