भूम / प्रतिनिधी-

माणकेश्वर येथील मनोज दनाने (अंधारे) यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जि.प प्रा.शा अंधारेवस्ती(माणकेश्वर) येथील विद्यार्थ्यांसाठी 500 इंग्रजी स्टोरी बुक्स भेट दिली आहेत, मनोज दनाने हे उच्चशिक्षित कॅलफोर्निया   स्थित सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कथा, कॉमिक्स, कादंबरी असलेली पुस्तके भेट दिली आहेत. विद्यार्थ्यांनी, शिक्षकानी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके भेट देऊन वाचनालय समृद्ध करावे,असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तू अंधारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर अभियंता राजाभाऊ दनाने, शिवाजी दनाने, विठ्ठल दनाने,शशिकांत चेचे हे होते तसेच यावेळी प्रा किसन अंधारे, सचिन अंधारे, पम्पू अंधारे, लक्ष्मण खुळे, शहाजी घावटे, भैया यादव यांची उपस्थिती होती

प्रास्तविक संदीप मोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुधीर काळे यांनी केले. 

 
Top