तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेचा शारदीयनवराञ उत्सव संपल्याने देवी दर्शनार्थ भक्तांना महाद्वार मधुन प्रवेश देण्यात यावा तसेच  श्री तुळजाभवानी देविस दर्शनासाठी येण्याच्या भाविकास देण्यात येणारे फ्री पास रद्द करुन  थेट दर्शनार्थ सोडावे , अशी मागणी  बाळासाहेब भोसले यांनी केली आहे.

 शारदीय नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना पाकींग मार्ग दर्शन व्यवस्था  केली होती . परंतु नवरात्र उत्सव संपुन आता आठ दिवस होत आहेत . तरीही आजपर्यंत भक्तांना महाद्वारातुन प्रवेश दिला जात नाही . सध्या घाटशिळ रोड कार पार्कीग मधुन दर्शन पास देवुन दर्शनार्थ सोडले जात आहे.  त्यामुळे भाविकांना सदर ठिकाणी जाऊन पास घेणे आणि तेथुन दर्शनास जाने याचा मोठा नाहक त्रास  होत आहे . तसेच सदर घाटशिळ रोड पाकींग मधील दर्शन मंडप काढण्याचे काम चालू असुन त्याच्या खालुनच भाविकांचा मोठी वर्दळ आहे . त्यामुळे सदर ठिकाणी अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता आहे .  भाविकांना  दर्शनार्थ फ्रि पासची सेवा बंद करून थेट मंदीरात  सोडण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.

 
Top