उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील बावी (ढोकी) येथील एका विवाहितेने छळ होत असल्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी अमित पाटील यांनी मंगळवारी विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. लग्नात राहीलेली वरदक्षिणेसाठी व मूल होत नसल्याच्या कारणावरून पती अमित मोहनराव पाटील, साधना पाटील, मोहनराव पाटील यांनी त्यांचा छळ केला होता.


 
Top