उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी आंधळे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, नायब तहसीलदार श्रीमती शिल्पा कदम, पंकज मंदाडे, अव्वल कारकून चव्हाण एस.जी., नरसिंह ढवळे, महेश कुलकर्णी, शेख शाकीर आणि युवराज तांदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top