तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील  बॅनर फाडणाऱ्या आरोपीचा शोध लावण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे  बॅनर  फाडल्या च्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही. बॅनर फाडणाऱ्या आरोपीचा कसून तपास करावा व या आरोपींना उस्मानाबाद जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पाठवली आहे.

 
Top