उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तुकाराम महाराजांचे दहावे वंशज  गुरूवर्य शिवाजीराव मोरे महाराज यांच्या हस्ते श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाइन टेस्ट सीरीजचा 11 वी,12 वी व रिपीटर उस्मानाबाद युनीटचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी  शेषाद्री अण्णा डांगे, संचालक प्रा. सोमनाथ लांडगे, संचालक प्रा. नागेश गोटे, वृदांवण फाऊंडेशनचे सचिन पाटील, शिवाजीराव गीड्डे, मकरंद पाटील, पांडुरंग अण्णा पवार, जाधव सर उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत दर्जेदार टेस्ट तेही माफक दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल आण्णा डांगे यांनी टेस्ट सीरीजचे व संचालकांचे कौतुक केले.यावेळी शिवाजीराव मोरे महाराज यांनी या टेस्ट सिरीजचा फायदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना व्हावा व श्री साई श्रध्दा एज्युकेशनचा असाच नावलौकिक वाढत जावा, असा शुभ अशिर्वाद दिला.

 
Top