उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवराज्याभिषेक सोहळा समितीची, कार्यकारिणी सभा शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद. येथे संपन्न झाली. सदर कार्यकारणीच्या सभेमध्ये समितीची नूतन कार्यकारिणी नियुक्त करणे कामी सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सभेत शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष- श्री. शशिकांत खुने, उपाध्यक्ष  श्री धर्मराज सूर्यवंशी, सचिव श्री दत्तात्रय साळुंके, यांनी   निवडी जाहीर केल्या.

 त्यामध्ये  कार्याध्यक्ष श्री रवि मुंडे, कार्याध्यक्ष   डॉ. शतानंद दैठणकर, कार्याध्यक्ष ग्रामीण श्री कंचेश्वर डोंगरे संघटक श्री निशिकांत खोचरे संघटक शहर श्री अमोल पवार संघटक ग्रामीण अच्युत थोरात, कायदे सल्लागार श्री. प्रशांत जगदाळे, प्रवक्ता श्री. आनंद जाधव सह प्रवक्ता श्री. धनंजय साळुंके, प्रवक्ता श्री. रियाज शेख, कोषाध्यक्ष श्री. सुनील मिसाळ, सहकोषाध्यक्ष श्री विकास जाधव, उपकोषाध्यक्ष श्री. गणेश नलावडे, प्रसिद्धीप्रमुख श्री. अशोक गुरव, सहप्रसिद्धीप्रमुख श्री. संतोष घोरपडे, उपप्रसिद्धीप्रमुख श्री. मच्छिंद्र कांबळे, सोशल मीडिया श्री. दत्तात्रय जावळे, नितीन वीर, मनोज शेलार, महिला प्रमुख सौ. शीलाताई जोशी, महिला उपप्रमुख किरण गायकवाड, महिला उपप्रमुख सौ. वर्षा आतकरे, यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी समितीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top