उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सेवा व समर्पन अभियान राबविन्यात येत असून त्या अनुषंगाने उस्मानाबाद  जिल्ह्यात बौठकीचे आयोजन करन्यात आले होते. या बौठकीस प्रदेश उपाध्यक्ष श्री. बसवराज मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगरुळे बोलत असतांना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 17 सप्टेंबर 2021 या वाढदिवसा पासून सेवा व समर्पन अभियान देशभरात राबविन्यात येत असून 2 आक्टोबर 2021 राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती देखील या कार्यमाचा एक भाग आहे. या दिवशी सर्वांनी स्वदेशीचा नारा देत खादी वस्त्र परिधान करुन जिल्हाभरात सर्व ठिकानी तिरंगा रॅली काढण्यात यावी असे सांगीतले.

 पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत, वोकल फॉर लोकल या सर्व अभियांनासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व आघाड्या व प्रकोष्ठ या सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस मा. आ. सुजीतसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.

 या बौठकीस नेताजी पाटील, रामदास कोळगे, पिराजी मंजूळे, अॅङ नितीन भोसले, प्रदिप शिंदे, सुनिल काकडे, राजाभाऊ पाटील, प्रमोद देशमुख, सतिश देशमुख, निहाल  काझी, प्रविण सिरसाटे, नामदेव नायकल, बालाजी गावडे, दाजीआप्पा पवार तसेच जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top