तेर  / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपये व घरांचे व दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. या प्रकरणी प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड व सुनील गायकवाड यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने खरीप पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई राज्य शासनाच्या वतीने देण्यात यावी तसेच अतिवृष्टी झाल्याने अनेक दुकानात पाणी शिरले आहे .त्यामुळे दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी तसेच अतिवृष्टीमध्ये तेर येथील अनेक घरे पडली असून त्यांचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झालेले आहे. त्यांना प्रत्येकी राज्य शासनाच्या वतीने 25 हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तेर येथील राहुल गायकवाड व सुनील गायकवाड यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top