उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दिपावली सणाचे औचित्य साधून सारोळा (बु.ता.उस्मानाबाद) येथील भव्य क्रीडा स्पर्धाचे सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले व अजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सारोळा येथील गुळपेटीच्या मैदानावर मंगळवारी (दि.२६) सकाळी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. विजेत्या संघास विविध पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे. शुभारंभप्रसंगी मारूती रणदिवे, महेश वाघमारे, आकाश शिंदे, मिया सय्यद, नागेश इसाके, अश्विन लिंगे, प्रशांत काळे, गौरव पाटील, अभिषेक कुदळे, अजय ठाकूर, इरफान कादरशेख, सुरज आकुसकर, करण पवार आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत जास्तीत-जास्त खेळाडुंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top