उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आळणी परीसरात बाधित क्षेत्रात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक दिवसांपासून सोयाबीन पिकात पाणी साचलेले असल्याने शेंगा काळ्या होणे,बुरशी लागणे,कोंब फुटणे याला सुरुवात झालेली आहे.सणासुदीच्या तोंडावर हा आर्थिक फटका अनेकांसाठी असह्य ठरणार आहे.दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे उगवलेल्या परिस्थितीने खचून जाऊ नका शेतकऱ्यांना आधार दिला.आळणी गावातील शेतीची पाहणी करून पंचनामे करून घेण्यास सुरूवात केली.

याप्रसंगी तलाठी भैरूमल डि.व्हि.,कृषी सहाय्यक बी एच जगताप,ग्रामसेवक राजेंद्र मैदाड,ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड,रवि कोरे आळणीकर,शेतकरी नारायण कोरे,पदू भैय्या वीर,शाम लावंड,प्रसाद वीर,विकास पाटील,धनंजय कापसे,चंद्रकांत भांडेकर,आदिंची उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचमाने केले.


 
Top