तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील जळकोट परिसरात महसुल व  पोलिस  विभागाने गुरुवार दि. ९ रोजी  विविध ठिकाणी छापा टाकुन 9630 लिटर बायोडिझेल सदृश्य ज्वलनशिल पदार्थ किंमत 777400 रुपये व इतर साहित्य.540000असे एकुण 1317400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच जणांना विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात बायोडिझेल विक्री बाबतीत ओरड चालु होती या पार्श्वभूमीवर : याबाबतीत  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यानी  प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हयात बायोडिझेल सदृष्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक करणाऱ्या ठिकाणी व अवैध विक्री करणा - या ठिकाणावर अचानक छापे  कार्यवाही करण्यासाठी महसुल व पोलीस विभागाची एकत्र पथके तयार करून कार्यवाहीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने  तुळजापुर तालुक्यात मा.उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद यांचे उपस्थितीत गुरुवार दि. ९ रोजी अचानक धाडसत्र राबविले असता पाच ठिकाणी बायोडिझेल सदस्य ज्वलनशील पदार्थाची साठवणुक व विक्री करताना कार्यवाही करण्यात आली .

 सदर प्रकरणात  श्री दिनकर प्रभाकर मुरवसे, सचिन दगड हासुरे, सत्यनारायण शिवाजी कदम ,  श्री खासिम पुनमिया  जमादार, श्री शेषेराव शंकर काळे  सर्व  रा. जळकोट ता. तुळजापुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जप्त करण्यात आलेल्या  बायोनिझेल चे अंदाजे बाजार मूल्य रू .7,70,400 / - इतके असून ताब्यात घेतलेल्या साहित्याची किंमत अंदाजे रु .5,40,000 / - इतके आहे . 

सदर कार्रवाई योगेष खरमाटे उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद ,  सौदागर तांदळे तहसिलदार तुळजापुर , जगदीम राऊत सपोनि पो स्टे नळदुर्ग , अमित भारती नायब तहसिलदार तुळजापुर , संदीप जा नायब तहसिलदार तुळजापुर , संतोष पाटील नायब तहसिलदार तुळजापुर , अमर गांधले मंडळ अधिः नळदुर्ग , नेमचंद शिंदै मंडळ अधिकारी इटकळ , पवन मौकरे मंडळ अधिकारी जळकोट , अशोक भातम परमेश्वर शेवाळे , आबासाहेब सुरवसे , गणेश जगताप , दयानंद काळे , तुकाराम कदम , ( सर्व तलाठी ) तसेच नकदुर्ग पोलीस स्टेशन मधील सपोफौ / 429 जोशी , पोह / 900 कांबळे , पोह / 1251 बांगर , पोह / 487 गायकवाड , मोना / 1170 सुरवसे , पोकों / 1851 सगर , पोकॉ 1681 पाटील यांनी केली. 

 
Top