उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यातील पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी यांच्या बदल्या झाल्या असून उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली उपायुक्त मुंबई शहर येथे झाली आहे तर त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक म्हणून निवा जैन या पदभार घेणार आहेत, जैन यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट 1 पुणे येथून उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. जैन यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथम महिला पोलीस अधीक्षक पदाचा मान मिळाला आहे.

2008 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या पोलीस अधीक्षक निवा जैन यांना केंद्राने शौर्य पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे. पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती. कठुआ येथील राजबाग पोलीस ठाण्यावर २५ मार्च २०१५ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. त्यावेळी पोलीस व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. ती स्थिती हाताळताना निवा जैन यांनी धाडसी वृत्तीने दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले. पोलीस व सामान्यांची जाणीव ठेऊन त्यांनी जीवतहानी होऊ न देता दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याची दखल घेत केंद्र शासनाने पोलिस मेडल फॉर गॅलन्ट्री अवॉर्ड (शौर्यपदक) जाहीर केले. निवा जैन यांना महाराष्ट्रात पहिली नियुक्ती अमरावती येथे मिळाली त्यानंतर पुणे व आता उस्मानाबाद येथे मिळाली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांची बदली पोलीस अधीक्षक दहशतवादी पथक औरंगाबाद येथे झाली असून त्यांच्या जागी सहायक पोलिस अधीक्षक लोणावळा पुणे येथील नवनीत कुमार कॉवत यांची बदली उस्मानाबाद अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. 

उस्मानाबाद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांची पदोन्नतीने सहायक पोलिस आयुक्त , ठाणे शहर येथे झाली आहे.

भूम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची औरंगाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे नवीन अधिकारी उस्मानाबाद ला मिळणार

उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी पदी रमेश बरकते यांची नेमणूक करण्यात आली असुन त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा येथून उमरगा बदली झाली आहे तर तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी सई प्रताप भोरे-पाटील उर्फ शीतल पाटील यांची उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग पुणे ग्रामीण येथून बदली झाली आहे.

 
Top