लोहारा / प्रतिनिधी-

मारहाण सुरू असल्याने सोडवायला गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाला काठीचा मार लागल्याने मृत्यू झाला आहे. लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी येथे बुधवारी (दि. ८) पहाटे घडली आहे. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुद्रवाडी येथील शिवाजी शिंदे यांनी पहाटे कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाणीस सुरुवात केली. यावेळी शेजारचे गुलचंद शिंदे मारहाण सोडविण्यास गेले असता हा प्रकार घडला.


 
Top