उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चारचाकी मालवाहू टेम्पोची पुन्हा नोंदणी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन आरटीओ एजंटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आरटीओ तपासणीमध्ये मदत करण्यासाठी एजंट तानाजी गोकुळ भोगील याने चार हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली. यापूर्वी १५०० रुपये रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. संदीप श्रीनिवास सूर्यवंशी (२८, रा. टाकळी, बेंबळी) तीन हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कार्रवाई डाॅ.राहुल खाडे, आर.एम.वाघमारे, प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, विष्णू बेळे, सिदधेश्वर तावसकर, विशाल डोके, अविनाश आचार्य यांच्या टीमने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा. 


 
Top