लोहारा/प्रतिनिधी      

लोहारा तालुक्यातील हराळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.8 सप्टेंबर रोजी 18 वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. या लसी केंद्रास तहसीलदार संतोष रुईकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. याआधी गावात जनजागृती करुन ग्रामस्थांनी लस घ्यावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून युवक व महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. 

हराळी येथे झालेल्या या उपक्रमात 180 ग्रामस्थांनी लसीचा डोस घेतला. यासाठी डॉ.संतोष मनाळे ( समुदाय आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली हराळी गावाचे उपसरपंच रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी, भैय्या धाडवे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, किसन सुर्यवंशी, गप्पू पाटील, अमित रनखांब, सुजित सुर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधव, अंगद सुर्यवंशी, सूरज सुर्यवंशी, मनोज पाटील आदी युवकांनी परिश्रम घेतले.

 
Top