उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली.

गोपनीय खबरेच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक निलंगेकर, पोलिस उपनिरिक्षक माने, हवालदार जगदाळे, चव्हाण, ढगारे, ठाकूर, कोळी यांच्या पथकाने साई हॉटेल समोरील सोलापूर- औरंगाबाद रस्त्यावरील उड्डान पुलाजवळ सापळा लावला. यावेळी एका कारला (क्र. एमएच १५, ईएक्स ३२१६) थांबवले. तेव्हा पोलिसांनी झडती घेतली असता गाडीतील दिपक शिंदे, विजय कटारनवरे, सुशांत गायकवाड, संदीप लोखंडे (सर्व रा. नाशिक), अब्दुल पटेल (रा. परंडा), रामा कांबळे (रा. उस्मानाबाद) यांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळ एक मांडूळ साप आढळून आला. पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.


 
Top