नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनीने उपलब्ध करून दिली सुविधा

वाशी/ प्रतिनिधी-

भारत सरकारच्या नवीन स्थापीत सहकार विभागाच्या वतीने पहिले राष्ट्रीय सहकारिता संमेलन इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे दि.25/09/2021 रोजी सकाळी 9 ते 1 च्या दरम्यान पार पडले. या संमेलनात देशातील सहकार, क्रुषी, शेतकरी उत्पादक कंपनीचे दोन हजार प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष महणून  भारत सरकारच्या सहकार विभागाचे सहकारी मंत्री मा.श्री. अमितभाई शहा,प्रमुख पाहुणे म्हणून क्रुषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या संमेलनामध्ये नैतिक अँग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री. नितीन घुले यांनी आभासी पद्धतीने सहभाग नोंदविला. या संपूर्ण प्रक्षेपण आपल्याच गावात पाहण्याची सोय वाशी तालुक्यातील मौजे गोलेगाव,पाडीँ,इंदापूर या तीन ठिकाणी कंपनीच्या वतीने करण्यात आली होती. 

या प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष श्री. नितीन घुले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रतिनिधी सचिन कुंभार साहेब, गोलेगाव चे उपसरपंच श्री. विजय कागदे,पाडीँचे उपसरपंच श्री.उमेश चौधरी,इंदापूर चे धनराज गपाट,भरत गपाट, अशोक गपाट यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती.


 
Top