तुळजापूर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  उपजिल्हा रुग्णालय  येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लँटचे काम प्रगतीपथावर आहे. सदरील काम जि.व्ही.एस.इंडिया प्रायवेट लिमिटेड (बारामती) या कंपनीने द्वारे होत आहे.  13 के.एल. क्षमता असणाऱ्या सदरील प्लँट मुळे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय,कोविड सेंटर यांना ऑक्सिजन बाबतीत चिंता राहणार नाही. 

यावेळी कंपनीच्या संबंधित अधिकारी यांच्याशी प्लँट बाबतीत विस्तृत माहिती घेतली व तत्काळ काम पूर्ण करावे,असे रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी सांगितले.  यावेळी डॉ. श्रीधर जाधव उपस्थित होते.


 
Top