तुळजापूर / प्रतिनिधी-

नांदेड जिल्ह्यात महापुरूषाच्या पुतळ्याची विटंबना करून काढण्यात आलेला पुतळा सन्मानाने येत्या ८ दिवसात बसविण्यात यावा या मागणीसह विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूर येथील जुना बसस्थानक चौकात गुरुवार (दि. ०९) सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा व डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरकार, पोलिस प्रशासनाच्या वतीने निषेध घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा बसथानकात आल्यानंतर या ठिकाणी तासभर ठिय्या मांडण्यात आला. आंदोलनादरम्यान अन्याय अत्याचार विरोधात लहुजी शक्ती सेना, भीम-अण्णा सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी भाषाणातून रोष व्यक्त करण्यात येत होता. तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष नगिनाताई कांबळे, शिवाजी गायकवाड, किशोर साठे, सुरेश भिसे,अशोक जाधव यांच्यासह मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.


 
Top