तुळजापूर  / प्रतिनिधी-

 घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्याच्या विरोधात महसूलच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी दोन हाॅटेलवर कारवाई करत ६ घरगुती गॅस सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. दरम्यान कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज व्यक्त येत आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा आदेशावरून तहसीलदार सौदागर तांदळे यांनी महसूलची विविध पथके तयार करून तालुक्यातील हाॅटेल, ढाब्यावर छापे टाकत ही कारवाई केली.


 
Top