तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात  छञपती शिवाजी महाराज  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे  काम लवकर पूर्ण होणार असल्याची माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी येथे पुतळा पाहणी नंतर दिली.

  तुळजापूर शहरातील वैभव छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती   पुतळ्याचे काम लवकारात लवकर पूर्ण करून पुतळा उभा करण्याबाबत  दि २२ रोजी औरंगाबाद  दौऱ्यांचे आयोजन केले होते.  पुतळ्यांचे (मुर्ती) चे फिनीशिंग कलर   कामाबाबत सबंधीत एजन्सीधारकाची समक्ष भेट घेऊन सविस्तर  चर्चा  केली.  यावेळी  नगरसेवक पंडीतराव जगदाळे,विजय  कंदले,विशाल रोचकरी,बाळासाहेब सानप यांची उपस्थिती होती. 

 
Top