तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील भाविकांचे खास आकर्षण केंद्र बनलेल्या नव्याविद्युत रोषणाई कामास मंगळवार दि.21 पासुन आरंभ झाला असुन यंदाचे या विद्युत रोषणाईचे खास आकर्षण महाद्वारावरील लाईट इफेक्ट असणार आहे,

पुणे येथील विजयमामा उंडाळे, नितीन उंडाळे , संजय टोळगे,  सोमनाथ टोळगे हे देविभक्त २०१४ पासुन देविजींच्या संपुर्ण मंदीरावर आकर्षक अशी  विद्युत रुषणाई रुपी सेवा करीत आहेत.विजय उंडाळे यांनी २०१३ ला श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानला चांदीची उत्सव मुर्ती अर्पण केली होती.यंदा लाईटइफ्ट असणारी  विद्युत रोषणाई केली जाणार आहे.देवी गाभा-यात गाभारा गरम न होणारी पावरफुल्ल लाईट बसविण्यात येणार असल्याने देविजींची  आकर्षक रुप  भाविकांना दिसणार आहे. तसेच देविंजींचा मुखगर्भ व  भवानीशंकरवरील गाभाऱ्यावर आकर्षक फोकस विद्युत करण्यात येणार आहे.

या विद्युत रोषणाईसाठी १५  कामगार दिवसराञ काम करीत असुन शनिवारी ही विद्युत रोषणई पुर्ण केली जाणार आहे. या विद्युत रोषणाईचे डिझाईन संजय शेट आडागळे पुणे यांनी केले असुन देवि मुख्यगाभा-यातील फोकसिंग साठी उल्हास सहस्त्रबुद्धे मुंबई यांनी मार्गदर्शन केले आहे यांना विजय उंडाळे,  नितीन टोळगे, संजय टोळगे, सोमनाथ टोळगे, शैलेश गायकवाड, बंडु वाळवेकर हे सहकार्य करीत आहेत. या विद्युत रोषणाईची वर्षभराची  देखभाल सुरेश कावरे, बडोदकर कुणाल,  अनंत कावरे हे करणार आहेत


 
Top