उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान भरपाई म्हणुन शासनाने हेक्टरी ५०,०००/- रु. देण्याची व्यवस्था करावी व नुकसान -झालेल्या पिकांचा पिक विमा १०० टक्के जाहीर करावे  या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार िद. २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

 निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रामुख्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या “प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश पिके पाण्याखाली आहेत. शासनाने पंचनाम्याचे ढोंग न करता शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५०,०००/- रु. नुकसान भरपाई जाहीर करावी.  अन्यथा ५०,०००/- रु. नुकसान भरपाई न दिल्यास व १०० टक्के विमा जाहीर न केल्यास शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हयात तीव्र अंदोलन करण्यात येईल. या अंदोलनामुळे जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन राहिल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर  मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, मारूती कारकर, संजय वाघ, सिध्देश्वर सुरवसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top