उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 माणूस घडविण्यामध्ये आई वडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून अशा शिक्षकांचा सन्मान आज एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान तर्फे जो होत आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे असे मत अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 26 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आयोजित जिल्हास्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आस्मिता कांबळे, डेप्युटी कंट्रोलर आँफ अकाउंट्‍स मुंबई ज्ञानेश्वर वीर, जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी धनंजय काळे, शिक्षकतज्ञ एम.डी.देशमुख, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव दीपक भराटे, एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, संस्कृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात व संस्कृती प्रतिष्ठाण अध्यक्ष राम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकता व संस्कृती या संस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील काम करत असून अशा कामामुळे संस्थेचे समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना त्या क्षेत्रातील बापमाणूस होण्यासाठी प्रयत्न करावे अशी ही अपेक्षा यावेळी रूपाली आवले यांनी व्यक्त केली.

शिक्षकांनी केलेल्या आजपर्यंत च्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमा तून गौरव होत असून गेल्या पाच वर्षापासून या फाउंडेशन मार्फत गौरव सोहळा होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. कोवीडच्या महामारी मध्ये सुद्धा शिक्षकांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली असून त्याबद्दल आम्ही सर्व ऋणी राहू अशी भावना जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केली. अशा पुरस्कारामुळे शिक्षकांना पुढील चांगल्या कार्यासाठी नेहमी ऊर्जा मिळत असून ज्याच्याकडे पाहून आम्ही घडलो व इथपर्यत आलो ते केवळ शिक्षकांमुळे ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवतो त्याप्रमाणे एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान या परिवाराने या गुणवंत शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल या सत्कार सोहळ्यातून शिक्षकांचे कौतुक केले असुन याबाबत दोन्ही संस्थेचे आभिनंदन करत असे कार्य भविष्यात करत राहावे अशी ही अपेक्षा यावेळी अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केली.

 शिक्षक पेशा हा जगातील सर्वात मौल्यवान पेशा आहे असे मत डेप्युटी कंट्रोल ऑफ अकाउंट ज्ञानेश्वर वीर यांनी व्यक्त केले. ज्या शिक्षकांनी मला शिकवले त्यांच्यासोबत आज माझ्या हस्ते शिक्षकांचा सन्मान होत आहे ही बाब माझ्यासाठी अतिशय आनंदाची असून भविष्यात अशा कार्यक्रमासाठी मी सदैव संस्थेच्या पाठीशी राहील असे मत ज्ञानेश्वर वीर यांनी बोलताना व्यक्त केले. शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा मध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त उत्तीर्ण कसे होतील याकडे लक्ष देऊन शिक्षकांनी शिक्षक म्हणून नाहीतर आचार्य म्हणुन विद्यार्थी घडवले पाहिजेत अशी भावना ज्ञानेश्वर वीर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात एकता फाउंडेशन कार्याध्यक्ष विशाल थोरात यांनी फाउंडेशन च्या कार्याचा आढावा सांगून शिक्षक रत्न पुरस्कार निवड समितीचे बाबतची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर व सूत्रसंचालन एकता फाउंडेशन सचिव आभिलाष लोमटे यांनी केले.

 भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सुधीर पाटील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद यांना देण्यात आला. श्री. विक्रम माणिकराव पाटील जि.प. कन्या प्रा. शाळा बेंबळी, श्री. संतोष काकासाहेब घार्गे श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद, श्री. धनंजय सदाशिव डोळस छञपती संभाजी विद्यालय जवळा ता. कळंब, श्री. प्रदीपकुमार अरुण गोरे नुतन विद्यामंदीर उस्मानाबाद, श्री. भालचंद्र भारत कोकाटे जि.प.प्रा.शाळा शिवाजीनगर ता. उस्मानाबाद, श्री. सुशिलकुमार सुधाकर तीर्थकर

विद्याभवन हायस्कुल कळंब ता. कळंब, श्रीमती. प्रणिता हरिश्चंद्र भंडारे छञपती शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता.उस्मानाबाद, श्रीमती. सुनीता शंकरराव शिंदे जि. प. प्रा. शाळा गौडगाव ता. उस्मानाबाद, श्री. संजय प्रभाकर देशमुख जि. प. शाळा पळसवाडी ता. उस्मानाबाद, श्री. ज्ञानेश्वर गुरलिंगआप्पा माशाळकर भारत विद्यालय बेडगा ता. उमरगा, श्री. लक्ष्मण संभाजी शेळके न्यु हायस्कुल चिंचोली ता.भुम, श्री. अर्जुन चिंतामण जाधव जि.प. कन्या शाळा कळंब ता. कळंब, श्रीमती. ज्योती दिलीप पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा ता. लोहारा, श्री. संघपाल पंडीत सुकाळे जि.प. शाळा झिन्नर ता. वाशी, श्री. अनिल आभिमान शिंदे

जि.प. प्रा.शाळा हिंगणगाव ता. कळंब, श्री. तुकाराम विष्णु वाडकर जि.प.प्रा.शाळा सांगवी काटी ता. तुळजापुर, श्री. श्रीमंत संदिपान चौरे जि.प. प्रा. शाळा पाचपिंपळा ता. परंडा, श्री. विठ्ठल उत्तम नरवडे जि.प. प्रा.शाळा पिंपळा बुद्रक ता. तुळजापुर, सौ प्रज्ञा विकासराव कुलकर्णी कल्याण सागर माध्यमिक विद्यालय परंडा ता.परंडा, श्री संजय ज्ञानोबा देशमुख भारत विद्यालय उमरगा ता.उमरगा, श्री गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी जि.प.प्रा. शाळा माकणी ता. लोहारा, श्री चंद्रकांत लक्ष्‍मण तांबे श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम ता. भूम, श्रीमती सुषमा श्रीकांत मसे जि.प. प्रा. शाळा बाभळगाव ता.कळंब, श्री रवींद्र शिवाजीराव माने जि.प.प्रा. शाळा करंजखेडा ता. उस्मानाबाद, श्री सुनील गोविंदराव काळे हरिभाऊ घोगरे प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उपळा ता.उस्मानाबाद, श्री सचिन बाळासाहेब छबिले छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी ता वाशी, श्री दत्तात्रय प्रभाकर काशीद जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचपुर ता. परंडा, सौ. सुलभा गजानन देशमाने आर्य चाणक्य प्राथमिक विद्यालय धाराशिव, श्री हरिश्चंद्र भगवान शिंदे छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद, श्री नितीन दशरथ ढगे जि.प. प्रा. शाळा मसला खुर्द ता. तुळजापूर, श्रीमती. कांचन गौतम काशीद जि. प. प्रा. शाळा केमवाडी ता. तुळजापूर या सर्वांचा सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गोरे प्रवीण, प्रसाद देशमुख, विकास माळी, बलराज रणदिवे, माऊली जोगी, केदार लगदिवे, शिवलिंग गुळवे, अक्षय गांधी, शिवरुदप्रताप भुतेकर, संतोष माळी, ओम नाईकवाडी, लखन मुंडे, प्रशांत जाधवर, सलमान शेख, असलम शेख, शिवाजी गवळी,दीपक जाधव, शिवाजी दहिहंडे, शेषनाथ वाघ, सौरभ ढोबळे, एकता फाउंडेशन चे सचिव आभिलाष लोमटे व दोन्ही संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top