रुपामाता संस्थेला आर्थिक वर्षात ६५ लाख नफा वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सहकार हे सतत बदलणारे व गतिमान सेवा क्षेत्र असल्याने या क्षेत्रात काम करीत असताना या वेगाशी समांतर राहणे अत्यंत महत्वाचे आहे. या दृष्टीने कामकाजात गतिमानता आणून धोरणे आखणे गरजेचे आहे. यासाठी आपली रुपामाता संस्था सदैव नवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार करून सभासदांना नवनवीन सेवा देण्यात अग्रेसर आहे. संस्थेच्या मालकीचे मराठवाड्यातील सर्वात मोठे वेअर हाउस शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी सध्या तयार आहे. संस्थेचे सभासद हितचिंतक ग्राहाक यांच्या मदतीने सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात रुपामाता संस्था उत्तुंग भरारी घेत आहे असे प्रतिपादन रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्री. व्यंकटराव गुंड यांनी केले. रुपामाता अर्बन ची १८ वी व रुपामाता मल्टीस्टेटच्या १० व्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या अध्यक्षस्थानी बोलत होते. सभासदांना ९% लाभांश वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्री. लोमटे महाराज, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी यांची उपस्थिती होती. प्रारंभी श्री. तुळजाभवानी माता व मातोश्री कै. रुपाबाई गुंड यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. आर्थिक वर्षात निधन पावलेल्या संस्थेच्या हितचिंतक, सभासद, ग्राहकाना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवाल वाचन, संस्थेचा चढता आलेख व माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यनारायण बोधले यांनी दिली. यावेळी आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या तुळजापूर, लोहारा, करजखेडा, उस्मानाबाद व पाडोळी शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. अजित गुंड, शंकर गाडे, संजय पटवारी, शरद गुंड, दत्तात्रय सोनटक्के, ज्ञानदेव राजगुरू, संचालिका सौ. सुलभा गुंड, महानंदा माने, भाग्यश्री जाधव, व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रूपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद खांडेकर यांनी केले तर संस्थेचे संचालक श्रीकांत घोडके  यांनी आभार मानले. 

रुपामाता संस्थेचा मार्च २०२१ अखेर संस्थेचा चढता आलेख

एकूण ठेवी २०६ कोटी 

एकूण कर्ज वाटप १६५ कोटी त्यापैकी सोनेतारण कर्ज २२ कोटी आहे.

संस्थेची इतर बँकेत गुंतवणुक ३१ कोटी आहे.

संस्थेला २०२०- २०२१ आर्थिक वर्षात ६५ लाख नफा झाला आहे.

 

 
Top