उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  उमरगा  नगर परिषद मध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला असून ,उमरगा नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदी भाजपचे हंसराज गायकवाड यांची निवड झाली आहे.हंसराज गायकवाड यांच्याकडे पूर्वी उपनगराध्यक्ष पद होते. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्किट हाऊस उस्मानाबाद येथे हंसराज गायकवाड यांच्या निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,तसेच सर्वांचे अभिनंदन केले.तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी ही गायकवाड यांचा सत्कार केला. 

 याप्रसंगी ऍड खंडेराव चौरे, नेताजी पाटील ,अभय चालुक्य, इंद्रजीत देवकते ,राजसिंह राजेनिंबाळकर, विजय शिंगाडे ,प्रवीण सिरसाठे, दिग्विजय शिंदे, राजकुमार पाटील ,शिवाजी गिड्डे ,पांडुरंग पवार, तसेच धाराशिव शहर व उमरगा येथील पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top